Sunday, 15 May 2011

हा नादच खुळा !! वाजले ना बारा



या महिन्यात बरेचसे गंभीर असे विषय या आधीच्या 'पोस्ट' मध्ये आले आहेत ..त्यामुळे डोके जड झाले त्यावर उतारा देण्यासाठी पुढील ब्लोग सादर करत आहे ..मागच्या रविवारची गोष्ट आहे ....ऐका...


रविवार असल्याने तंगड्या वर करून आडवे पडून टंगळ मंगळ करत पडलो होतो. समोर संगणकावर काही व्हीडीओ साँग मधील काहीतरी अवयव हलताना दिसत होते ...(त्याला डान्स किंवा नृत्य म्हणतात) ...एवढ्यात

चैत्रपुनवेची रात, आज आलीया भरात, धडधड काळजात माझ्या माईना,.....................

या ओळी ऐकू आल्या ...आता निरखून पाहणे भाग होते ...खानविलकरांची अमृता आता तिच्यासोबत आमचे बारा वाजवणार होती....मला ती टी.व्ही. वरची डेरीमिल्क ची 'मन मी लड्डू फुटा' ही जाहिरात आठवली कारण तंगड्या पसरून आडव्या पडलेल्या माझ्या डोक्यात अमृता खानविलकर माझ्या शेजारी येवून नाचत आहे असा लाडू फुटला होता ...(त्याचे फार तपशील हा ब्लोग कौटुंबिक असल्याने देता येणार नाहीत ) फुटलेल्या दुसऱ्या लाडवाचे कल्पनाचित्र मात्र येथे मांडता येईल. हा दुसरा लाडू मला थेट २०२५ मध्ये घेवून गेला ...त्यावेळी देखील मराठी ची अवस्था कुसुमाग्रजांनी मागे राज्य शासनाला पत्र पाठवून 'मराठी दरिद्री' झाली असून फाटक्या कपड्याने मंत्रालयाच्या पायऱ्यावर उभी अशीच झाली होती......कोणीतरी कुंचला घेवून त्याचे फटकारे मराठी च्या रक्षणासाठी चालवीत आणि तोंडाची वाफ दडवीत असल्याचे दिसले त्यावरून याचा वारसा 'मातोश्री' किंवा 'कृष्कुंज' असल्याच समजून आले. अश्यावेळी शाळेतील मराठी पुस्तके आहेत तरी कशी हे पाहण्यासाठी मी एका शाळेत गेलो ...आश्चर्य शाळेत मराठीचा तास चालू होता म्हणजे अजून 'मराठी' टिकून होती. या मराठीला जपण्यासाठी मुलांना 'शृंगाररस ' हा विषय शिकवणे चालू होते ....त्यासाठी कविता होती ...हो कविताच

हो...

चैत्रपुनवेची रात, आज आलीया भरात, धडधड काळजात माझ्या माईना,

कधी कवा कुटं कसा, जीव झाला येडापिसा, त्याचा न्हाई भरवसा, तोल र्‍हाईना,

राखली की मर्जी तुमच्या जोडीनं मी आले,

पिरतीच्या या रंगी राया, चिंब ओली मी झाले,

राया सोडा अता तरी, काळयेळ न्हाई बरी, पुना भेटु कवातरी साजणा......

मला जाउद्या ना घरी, आता वाजले की बारा,

हे....कशापाई छळता, मागंमागं फिरता, असं काय करता दाजी, हिला भेटा की येत्या बाजारी,

हे....सहाची ती गाडी गेली, नवाचीबी गेली, आता बाराची गाडी निघाली,

हिला जाउद्या ना घरी, आता वाजले की बारा,

मला जाउद्या ना घरी, आता वाजले की बारा... हा...जी जी रं जी ||धॄ||

हो....

आयन्यावाणी रुप माजं, उभी ज्वानीच्या मी उंबर्‍यात,

नादावलं खुळंपिसं, कबुतरं ह्ये माज्या उरात,

भवताली भय घाली, रात मोकाट ही चांदन्याची,

उगा घाई कशापाई, हाये नजर उभ्या गावाची,

हे.. नारी गं, रानी गं, हाये नजर उभ्या गावाची,

शेत आलं राखणीला, राघु झालं गोळा,

शीळ घाली आडुन कोनी, करुन तिरपा डोळा,

अता कसं किती झाकु, सांगा कुटंवर राखु, राया भानं माजं मला र्‍हाईना.....|

मला जाउद्या ना घरी, आता वाजले की बारा,

हे....कशापाई छळता, मागंमागं फिरता, असं काय करता दाजी, हिला भेटा की येत्या बाजारी,

हे....सहाची ती गाडी गेली, नवाचीबी गेली, आता बाराची गाडी निघाली

हिला जाउद्या ना घरी, आता वाजले की बारा,

मला जाउद्या ना घरी, आता वाजले की बारा... हा...जी जी रं जी ||१||

हो....

आला पाड, झाला भार, भरली उभारी घाटाघाटात,

तंग चोळी, अंग जाळी, टच्च डाळिंब फुटं व्हटात,

गार वारं, झोंबनारं, द्वाड पदर जागी ठरना,

आडोशाच्या खोडीचं मी, कसं गुपित राखु कळंना,

हे.. नारी गं, रानी गं, कसं गुपित राखु कळंना,

मोरावानी डौल माझा, मैनेवानी तोरा,

अवंदाच्या बा वर्सला मी, गाठलं वय सोळा,

जीवा लागली या गोडी, तरी कळ काढा थोडी,घडी आताची ही तुमी र्‍हाउद्या.....|

मला जाउद्या ना... आता वाजले की बारा,

मला जाउद्या ना घरी, आता वाजले की बारा, अहो जाउद्या ना घरी,

हे....कशापाई छळता, मागंमागं फिरता, असं काय करता दाजी, हिला भेटा की येत्या बाजारी,

हे... सहाची ती गाडी गेली, नवाचीबी गेली, आता बाराची गाडी निघाली,

हिला जाउद्या ना घरी, आता वाजले की बारा,

मला जाउद्या ना घरी, आता वाजले की बारा... हा...जी जी रं जी ||२||



आता या कवितेवर 'स्वाध्याय' दिलेला होता तो खाली दिलेला आहे त्याची उत्तरे मला पाठवून देणे .....

. खालील प्रश्नाची थोडक्यात उत्तरे द्या

.जीव येडापीसा होणे म्हणजे काय ते सांगून तो कुठे कुठे येडापिसा होतो ते सांगा

. 'राया' , 'दाजी ' यांचे स्वभाव वैशिष्ट्य रेखाटा

. 'उभी ज्वानीच्या मी उंबर्यात' याचा कल्पनाविस्तार करा.

. वरील कवितेच्या आधारे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील परिस्थितीचे चित्रण करा

'आता वाजले कि बारा ' असे कोण कोणास म्हणाले

.' टच्च डाळिंब' चित्र काढा

. मोर , मैना आणि मानव यांच्यातील साम्यस्थळे विषद करा

. '१६ वरीस धोक्याच' आणि 'अवंदाच्या वर्सला मी गाठल वय १६' यांचा तुलनात्मक अभ्यास करून तत्कालीन स्त्रियांची सामाजिक आणि मानसिक स्थिती सोदाहरण स्पष्ट करा.

. या कवितेच्या आधारे 'शृंगाररस ' आणि 'बिभित्स रस' याच्यातील साम्यस्थळे व्हिडीओ पाहून तपशीलवारपणे नमूद करा.

२. खालील वाक्यप्रचारांचा वाक्यात उपयोग करून त्यांचे अर्थ स्पष्ट करा

अ. धडधड काळजात न मावणे

ब. बारा वाजणे

क. शेत राखणीला येणे

ड. भान न राहणे


प्रकल्प : या कवितेआधारे ग्रामीण मराठी बोलीचा अभ्यास करण्यासाठी गावात जावून 'अमृता खानविलकर' 'राया' , 'दाजी' यांची भेट घेवून बोली भाषेस उर्जितावस्था प्राप्त करण्यासाठी त्यांना सोबत घेवून पथनाट्य सादर करा.
.
.
.
.
आपल्या उत्तराची वाट पाहत असलेले इयत्ता १० मधील विद्यार्थी आणि मी ...................

5 comments:

  1. lii kadak aaeh kavita ...

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. ' टच्च डाळिंब' चित्र काढा... hahahaha... enjoyed reading it! :)

    ReplyDelete
  4. अनिकेत ,
    शेतात बसूनच तुझे हे पोस्ट वाचत होतो.संपूर्ण पोस्ट भर गुदगुल्या होत होत्या पण.....
    "आता या कवितेवर 'स्वाध्याय' दिलेला होता तो खाली दिलेला आहे त्याची उत्तरे मला पाठवून देणे .."
    हा प्रश्न वाचून मात्र काळजात न मावणारी धडधड सुरु झाली ,आम्हाला भान राहील नाही.... थोडक्यात काय तर पुर्रे बारा वाजले.त्या मुळे जास्त वेळ न घालवता "त्या शेताच्या राखणी साठी धूम ठोकतो.
    लेख मस्त झालाय...

    ReplyDelete